पत्रकारिता ही समाजाच्या विकासासाठी असावी - विनोद गोळे

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी - सागर आतकर 

पत्रकारिता ही समाजाच्या विकासासाठी असावी असे मत पारनेर तालुका पत्रकार संघाचे मुख्य पदाधिकारी विनोद गोळे यांनी व्यक्त केले. श्री मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज येथे पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सहदेव आहेर उपस्थित होते. या पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात कवी संजय पठाडे, कवी संजय ओव्हळ, मा. कारभारी बाबर, मा. स्वाती ठुबे, मा. गीतांजली वाबळे, मा. सोमनाथ चौधरी, कवी प्रा. प्रविण जाधव, प्रा. सुमित गुणवंत, प्रा. नूतन गायकवाड यांच्या रचना सादर करण्यात आल्या. यावेळी निघोज येथे वैद्यकीय क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत असणारे व मुलिकादेवी विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर निचीत यांचे मंगळवार दि. १० रोजी निधन झाले त्यांना महाविद्यालय व पत्रकार संघ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी दीप प्रज्वलन करून व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणाचे ही जिवन उद्ध्वस्त न करता बातमी देण्याचे कौशल्य पत्रकार यांचेकडे असते. समाजातील वास्तव बातम्या पत्रकार यांनी दिल्या तर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल- विनोद गोळे (पत्रकार)

पत्रकार हा लोकशाहीचा आरसा असतो तसेच परिसरातील सर्व पत्रकारांचे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान आहे.- प्राचार्य डॉ. सहदेव आहेर

या कार्यकामासाठी कन्हैय्या उद्योग समुहाचे संस्थापक मा. मच्छिंद्र लंके साहेब यांचे सहकार्य लाभले.

यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता  उनवणे, पत्रकार संघाचे पदाधिकारी सुरेश खोसे पाटील, सहसचिव भास्कर कवाद, बाबाजी वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्वागत गीत वैशाली फंड यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर एरंडे यांनी केले.

यावेळी सागर आतकर, संदीप गाडे, आनंद भुकन, जयसिंग हरेल, योगेश खाडे, संपत वैरागर, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. प्रविण जाधव, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.विशाल रोकडे, प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा.सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. नीलिमा घुले, प्रा  स्वाती मोरे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. प्रियांका लामखडे, प्रा. रेश्मा ठुबे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधाक्ते, प्रा. संदीप लंके, प्रा. नवनाथ घोगरे, डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. अशोक कवडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आनंद पाटेकर व प्रा. प्रविण जाधव यांनी केले तर आभार डॉ. गोविंद देशमुख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top