पुरवठा विभागातील रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरिकांची होणारी लूट थांबवा

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज /  शिरूर / प्रतिनिधी किरण चौधरी :

शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात तीन खासगी इसमांची नेमणूक केली असून पुरवठा विभागात ऑनलाईन रेशनकार्ड करून देण्यासाठी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असून नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवून पैसा वसुल करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचे अविनाश घोगरे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विभाग असून या विभागात रेशन कार्ड काढणे, दुबार रेशनकार्डसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. पुरवठा विभागातील कर्मचारी नागरिकांकडून आर्थिक लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या तरी देखील कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

कोरोना महामारीने आर्थिक संकट मोठे आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य देत आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करावे लागते. याचा गैर फायदा पुरवठा विभागातील
खासगी व्यक्ती घेत असल्याचा आरोप अविनाश घोगरे यांनी केला आहे.

नागरिकांची लूट करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top