पिंपळनेर: संबंधित विभागाने दखल घेऊन आपली कामगिरी चोख पार पाडावी.- प्रांताधिकारी सुधाकर भोसले

0

 


महाराष्ट्र दर्शन न्यूज / पिंपळनेर / प्रतिनिधी - संदीप गाडे 

महाराष्ट्रातील पाचवे संत म्हणून ओळखले जाणारे श्री संत सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळया निमित्त महाराष्ट्रातील येणाऱ्या भाविक वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक विभागाने दखल घेऊन आपली कामगिरी चोख पार पाडावी. असे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी पारनेर तालुक्यातील श्री.संत निळोबाराय महाराज भक्तनिवास सदन मध्ये बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित बैठक प्रसंगी बोलताना म्हटले.

आजच्या बैठकीत काही विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत न राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल .

अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात होणार आहे. तसेच २१ फेब्रुवारी २०२३  या काळात यात्रा उत्सव होत असून प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख बजावावी जेणेकरून महाराष्ट्रातील येणाऱ्या भाविकांना व वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. 

या बैठकीत निळोबाराय देवस्थान ट्रस्ट निळोबाराय सेवा मंडळ व पिंपळनेर ग्रामस्थ वारकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुधाकर भोसले यांनी मागील वर्षी सार्वजनिक विभागास खडे बोल सुनावत मंदिराकडे येणारे सर्व रस्त्यांचे कामे उत्कृष्ट अत्यंत चांगले केल्याने भाविकांना होणारा त्रास कमी झाला होता. यापुढील काळातही मंदिराकडे येणारे जवळे सांगवी सूर्या व इतर ठिकाणाहून येणारे रस्ते आजही दर्जेदार नसल्याने येणाऱ्या पायी दिंड्या व भाविकांना त्याचा त्रास होतो. तो भविष्यकाळात मार्गी लागावा अशी मागणी उपस्थित असणाऱ्यांनी केली .

या बैठकीस तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष

अशोकराव सावंत, निळोबाराय वंशज व पायी दिंडी सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशिर, सरपंच देवेंद्र लटांबळे तसेच इतर शासकीय विभागाचे विभाग प्रमुख परिसरातून आलेल्या पायी दिंडी सोहळ्यांचे प्रमुख, पिंपळनेर ग्रामस्थ वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top