पाडळी दर्याला बहुत प्रतिक्षेनंतर अखेर गावात एस टी बस आली

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर : 

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या गावाला बहुत प्रतिक्षे नंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अखेर एस टी बस सेवा सुरु केली .

पाडळी दर्या ला गावासाठी दिवसभरासाठी चार एस टी बस प्रवाश्यांसाठी सेवा देत होत्या. पण कोरोना आजाराने जग भरात थैमान घातल्याने देशातील सर्व व्यवस्था ठप्प झाली. त्यात एस.टी ही ठप्प झाली. पर्यायाने जनजीवन विस्कळीत झाले. आज अखेर पारनेर आगाराने पारनेर, शिरूर, पाडळी दर्या नं . एम एच १४ बी टी १०४४ ही मुक्कामी एस.टी बस चालक एकनाथ रोहकले व वाहक संदीप काळे यांनी आणली, नि ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चालक व वाहकांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, ते पाहून चालक व वाहक भारावून गेले .

पाडळी दर्या हे गाव अती दुर्गम आहे. तिन्ही बाजूने डोंगर आहे. येथील ग्रामस्थांना कामा धंद्या निमित्ताने प्रवास करण्यासाठी एस टी बस हाच पर्याय आहे, पण तोही बंद होता. हे येथील एक युवक नेता राजेंद्र खोसे यांनी खा . सुजय विखे पाटील यांच्या कानावर घातले असता, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भा.ज.पा चे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी ही हा प्रश्न निकाली काढण्याचे खा. विखेंना साकडे घातले असता, त्यात त्यांनी जातीने  लक्ष घालून एस.टी चे विभाग नियंत्रक यांना या प्रश्नासंदर्भात लक्ष घालण्याचा आदेश दिला दिल्याने हा प्रश्न तात्काळ सुटण्यास मदत झाली.

यावेळी चालक रोहकले व वाहक काळे यांचा सत्कार राजेंद्र खोसे यांनी केला व महिलांनी औक्षण केले, यावेळी ज्ञानेश्वर कोरडे, भागा खोसे, अशोक खोसे, संतोष खोसे, तुकाराम खोसे, सुजित खोसे, संतोष जाधव, दिनकर तिकोने आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top