महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी : सागर आतकर
पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे, आपल्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील श्री कांती शुगर अॅण्ड पॉवर लि. देवीभोयरे कारखान्याचे ३५०० मे. टन प्रती दिन गाळप क्षमतेच्या आधुनिकीकरणासह विस्तारीक प्रकल्पाचे व १२.५ मे.वॅट सहवीज निर्माती प्रकल्पाचेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता शेतकर्याच्या ऊसाला चांगला बाजारभाव देता येणार आहे. शिवाय आता प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरुवात झालेली आहे. सदरच्या प्रकल्पामुळे पारनेर तालुक्यातील शेतकरी सुखी होणार असुन,तालुक्याच्या आर्थिक विकासाला कारखान्यामुळे आर्थिक गती येणार आहे. सर्व शेतक-यांचा ऊसाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कारखान्याने नजिकच्या काळात ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी ऊस विकासाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याद्वारे ऊसाच्या नविन जातीची लागवड वाढविण्यासाठी कारखाना प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लवकरच श्रीक्रांतीशुगर कारखाना इथेनॉल प्रकल्पाची उभारणी देखील करणार आहे.
त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, आपल्या तालुक्यातील संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे. कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीसाठी आवश्यक ती तोड वाहतुक यंत्रणा आहे. शिव ऊस तोडणी मशिनची व्यवस्था देखील कारखान्याने केली आहे. त्यासाठी गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे व ते पूर्ण करण्यात येईल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश नवले यांनी व्यक्त केला आहे. मागील गेल्या ७ हंगामामध्ये कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील शेतक-यांनी आजपर्यन्त अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतानाही आमचेवर विश्वास ठेवून कारखान्यास ऊस गाळपास दिलेला आहे. असाच विश्वास यापुढेही ठेवुन आपला ऊस आपल्या श्री क्रांती शुगर अॅण्ड पॉवर लि. कारखान्यास गाळपास दयावा व कारखान्याचे ठेवलेले ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश विदुराजी नवले यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद