नगर पुणे रस्त्यावर अपघात एक ठार, एक गंभीर जखमी

0




महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज :
पारनेर तालुक्यातील निघोज येथील व्यावसायिक श्री प्रकाश शेळके यांच्या दुचाकी ला बीड पाटोदा एस टी ने धडक दिल्याने एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाले .

प्रकाश त्रिंबक शेळके [ वय - ६० वर्षे ] हे आपल्या हिरो होंडा कंपनीची स्पेंल्डर दुचाकी [ नंबर एम एच १६ बी एल ९८७१ ] ने पारनेर तालुक्यातील निघोज येथून त्यांच्या बहीणीचा नातू दत्ता राऊत [ वय - १८ वर्षे ] याला महाविद्यालयीन परीक्षा देण्यासाठी त्याच्या गावी बीड जिल्ह्यातील पिंपळा देवी येथे सोडण्यासाठी जात असता
, त्यांच्या पाठीमागून येणारी पाटोदा आगाराची मुंबई येथून येणाऱ्या एस टी बस [ नं . एम एच २० - बी एल ३९७२ ] ने जोराची धडक देवून दुचाकी सह २०० फुट ओढत नेल्याने शेळके हे गंभीर जखमी झाले तर दत्ता राऊत याच्या डोके, छाती, पोटाला गंभीर मार लागल्याने अत्यावस्थेत नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने राऊत याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. एस टी बसचे चालक यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून हेड कॉन्स्टेबल माने हे पुढील तपास करीत आहे .

नगर येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह अत्यंसंस्कारासाठी त्याच्या बीड येथील पिंपळा देवी या गावी पाठविण्यात आले. हे दोघेही नाभिक समाजातील असून निघोज येथे शेळके यांचे सलून दुकान आहे, तर ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील असून दोघांची ही कौटुंबिक परिस्थिती नाजूक असून त्यांना मदतीचे गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी शेळके यांचा मुलगा नितीन याच्या ९७३०६७४४६५ या फोन पे नंबर वर मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top