महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी- सागर आतकर
महागणपती मल्टिस्टेट सोसायटी माध्यमातून ग्राहकांना कर्ज सुविधा देण्याचा प्रयत्न असून ठेवीदार व संस्थेचे हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क ठेऊन सहकार्य करावे. संस्थेच्या निघोजसह राज्यात दहा शाखा असून सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन विकास बेंगडे पाटील यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ संचालक पवन हगवणे, मुख्य समन्वयक शोभा टिकेकर, सल्लागार सलिम हावलदार, पांडुरंग बेलोटे, सुरेश खोसे, लक्ष्मण लाळगे, दत्ताशेठ नरवडे, दिलीप कवाद, दत्तात्रय चौधरी, अंजली नरसाळे, मार्केटिंग मॅनेजर राकेश सोनवणे आदी उपस्थित होते.
चेअरमन बेंगडे पाटील म्हणाले, संस्थेचे सर्व संचालक उच्च शिक्षीत व प्रसिद्ध व्यवसायिक म्हणून राज्यात परिचित आहेत. महागणपती मल्टिस्टेट सोसायटी माध्यमातून सर्वाधिक सेवा देण्याचा प्रयत्न आहे. संस्थेच्या माध्यमातून कालबाह्य बँकींग सेवा ही सहकारी वित्तीय सस्थांची ओळख मोडीत काढत खासगी बँकापेक्षा तत्पर, आधुनिक सेवा देण्याचा मानस आहे. ग्राहकांना हातातील मोबाईल मधून सर्व बँकींग व्यवहार हाताळता येतील. या शिवाय सभासदांना आपल्या ठेवीवर चांगले व्याज मिळेल. तसेच भागधारकांना चांगला लाभांश देता येईल आधुनिक तंत्रज्ञान वापर करुन सेवा देणार आहे. व्यापारी कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोने तारण, वाहन तारण कर्ज, अशाप्रकारे विविध कर्ज योजना, ठेवीच्या आकर्षक योजना असून जनतेने या मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन बेंगडे पाटील यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद