महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज प्रतिनिधी सागर आतकर
सध्या राज्यात साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे, त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळीपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत आहेत.
हे शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. शेतकरी यांनी कारखान्याच्या व्यवस्थेशी संपर्क साधला असता ते लुबाडणुकदारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आज राज्यात दिसत आहे. या बाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यना न्याय मिळावा व तोडणी व वाहतूकदारांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागू नये व या पूर्वी काढलेल्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी राज्य जनता दलाच्या शिष्ठ मंडळाने साखर संचालक मंगेश तीटकारे यांच्याकडे केली. यावेळी या शिष्ठ मंडळामध्ये जनता सेक्युलर पक्षाचे जेष्ठ नेते व माजी आमदार प्रा. शरद पाटील सर, प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, सांगली जिल्हाध्यक्ष के.डी शिंदे व श्री संजय आयनापुरे उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद