पुष्पावती नदीवरील पूल वाहून गेल्याने निघोज व शिरसुले गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी सहन करावा लागतो नाहक त्रास

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

शिरसुले - निघोज या परिसरातील पुष्पावती नदीवरील पूल वाहून गेल्याने निघोज व शिरसुले गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून लवकरात लवकर पन्नास लाख रुपये खर्चाच्या पुलाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी निघोज व शिरसुले ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपूर्वी या नदीवर शिरसुले व निघोज येथे पुल बांधण्यात आला होता. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने या पुलाच्या काही भागाला तडा गेला होता. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क करुन माहिती दिली होती. मात्र दखल घेतली गेली नाही. नुकतेच कुकडी डावा कालव्याचे पाणी पुष्पावती नदीला सोडण्यात आले. या पाण्याच्या दाबाने हा पुल पुर्णपणे ढासळला आहे. सातत्याने शिरसुले व निघोज ग्रामस्थ या पुलाचा दळणवळणासाठी वापर करतात. सध्या पुल ढासळल्याने लोकांचे येणेजाणे बंद झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top