महाराष्ट्र दर्शन न्यूज | शिरूर | प्रतिनिधी - किरण चौधरी
शिरूर पंचायत समितीसमोर लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ग्रामविकास विभाग वगळता इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामविकास विभागप्रमुखाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवाल खंड दोनमधील वेतन श्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत शासन वित्त विभागाच्या वेतन त्रुटीबाबत सूचना निर्गमित झालेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संवर्ग वगळता सर्वच कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे. या विरोधात आता जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सर्व संघटना आक्रमक पवित्रा घेऊन कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या वेळी अध्यक्ष लिपिक संघटना वंदना बांदल, उपाध्यक्ष आबासाहेब सरोदे, गुलाबराव खरबस, दिलीप धोत्रे, मच्छिद्र सारूक, भुजंगराव कर्पे, बिऱ्हाडे, सविता सालके, विनिता माने, योगिता गाडेबैल, विलास कोकाटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद