महागणपती मल्टिस्टेट सोसायटी आयोजित "खेळ पैठणीचा रंगला" कार्यक्रमात महिलांनी लाखो रुपयांची बक्षीसे जिंकली

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथे "खेळ पैठणीचा रंगला" या कार्यक्रमाचे महागणपती मल्टिस्टेट सोसायटी आयोजित या खेळांमध्ये निघोज व परिसरातील हजारो महिला सहभागी होऊन या खेळाचा आनंद लुटला. यामध्ये बहुतांश क्रिडा प्रकारात महिलांनी सहभागी होऊन लाखो रुपयांची बक्षीसे जिंकली. सुवर्णा मनोज ईधाटे या महिलेने पहिला नंबर मिळवीत स्कुटी जिंकली. द्वितीय क्रमांक राणी लोखंडे यांनी चक्की जिंकली, तृतीय क्रमांक कोमल नरसाळे, सिमा वराळ, सुप्रिया कवाद यांना सायकल हे बक्षीस मिळाले. तसेच निघोज परिसरातील महिलांनी पैठणीचा मान मिळवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे, निलेश पडवळ, अमित काताळे आदिंनी केले.

यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील, कविता लंके, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, महागणपती मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन विकास बेंगडे, ज्येष्ठ संचालक पवन हगवणे, मुख्य समन्वयक शोभा टिकेकर, सल्लागार सलिम हावलदार, पांडुरंग बेलोटे, सुरेश खोसे, लक्ष्मण लाळगे, दत्ताशेठ नरवडे, दिलीप कवाद, दत्तात्रय चौधरी, अंजली नरसाळे, मार्केटिंग मॅनेजर राकेश सोनवणे आदिंच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी खेळ पैठणीचा यामध्ये सहभागी झालेल्या हजारो महिलांना महागणपती मल्टिस्टेट सोसायटी वतीने बक्षीसे देण्यात येणार असून यामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी महागणपती मल्टिस्टेट सोसायटी या निघोज शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


पैठणीचा मान मिळवलेले महिला मानकरी:

पुष्पा वराळ, सोनल श्रीमंदिलकर, अश्विनी श्रीमंदिलकर, अश्विनी डोकडे, नम्रता बनसोडे, निलोफर मोमीन, सविता पवार, शोभा येवले कोमल तिकोणे, सविता चौधरी, श्रीदेवी लाळगे, आशा लाळगे, दिपीका शेळके, शितल हरिहर, सिमा सालके, उज्वला गायकवाड, पुजा सरोदे, स्वाती वरखडे, प्रियंका साळवे, करिष्मा वराळ, प्रियंका वराळ, चित्रा घोडे, विद्या वराळ, अमृता शेटे, अनुराधा बेलोटे, कांचन लंघे, रुपाली लंके, कोमल ढवळे, सविता लंके, शैला सोनवणे, दिपाली लोखंडे, विजया वरखडे, मनिषा शेवाळे, दिपाली सोनवणे

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top