जनता दल सेक्युलरच्या वतीने प्रस्थावीत 37 टक्के वीज दर वाढीबद्दल मुंबई प्रदेश कार्यालय येथे मोर्चा/आंदोलन

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / मुंबई

जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्थावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. या आंदोलन सरकारने जे वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे, या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे. 




या विरोधात शासनाने हा निर्णय मागे घेऊन मागील वीज दराप्रमाणे वीजदर आकारावा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, पत्रकार यांच्यावर होणारे हल्ले याविषयी कडक कायदा करावा, अशा विविध मागण्या घेऊन जनता दल सेक्युलर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोर्चा मध्ये महाराष्ट्र प्रदेश महासचिव रवी भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष सुहास बने, महासचिव ज्योती बडेकर, अपर्णा दळवी, स्मृती जाधव, हरिदास सागरे, जमील उद्दीन शेख, सुरेंद्र कुंज्जीकर, ताराबाई मेश्राम, भगवान साळवी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top