महाराष्ट्र दर्शन न्युज|पारनेर | प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील तहसीलदार शिवकुमार यांची पदोन्नती स्थगित करून त्वरित निलंबित करण्याबाबत समस्त शेतरस्ते पीडित शेतकरी पारनेर तालुका यांच्याकडून देण्यात आले. तहसीलदार कार्यालय या ठिकाणी दि.२४ एप्रिल रोजी पारनेर येथे लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या पेरु वाटप आंदोलन दरम्यान पारनेर तहसीलदार यांनी अयोग्य भाषेच्या वापर करून शेतकऱ्यांना दम दाटी करून पेरू फेकून देऊन कलम १४४ गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली.
तहसीलदार यांच्याकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नोटीस मिळाले नाही वेळोवेळी तहसील कार्यालय पारनेर येथे निवेदन दिले आहे व आंदोलनांचा इशारा सुद्धा दिला आहे.
तहसीलदार यांनी सर्व कर्मचारी यांना बोलवून व आंदोलनातील पेरू फेकून देऊन शेतकऱ्यांचा अवहेलना केल्या प्रकरणी या आधी सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची पदोन्नती स्थगित करून त्वरित निलंबित करण्यात यावे. तहसील मधील घडलेला प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
समस्त शेती रस्ता पीडीत शेतकऱ्यांची मागणी सप्तपदी अभियानातील प्रलंबित शिवबा शिव रस्त्यांचे अर्जावरील तातडीने कार्य करण्याबाबत तसेच पारनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावगावचे पाझर तलाव तातडीने तातडीने दुरुस्त करण्यात यावे महसुल सप्तपदी अभियानातील शेतरस्ता शिव पानंदरस्ता अभियानाच्या नावाखाली सर्व सामान्य शेतकऱ्यांचा घोर फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकार कठोर कारवाई करण्यात यावी. वरील मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास दिनांक ८ मे २०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर उपोषण धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलना दरम्यान कोणतेही अनुसूचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्व जबाबदार प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदन समाजिक कार्यकर्ते शरद पवळे, दशरथ वाळूंज, होशिराम कुदळे, भाऊसाहेब वाळूंज, संजय कनिच्छे, रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, पांडुरंग कळमकर, समिर लाळगे, सुर्यकांत सालके, बाळासाहेब औटी, श्रीनिवास शिंदे, बाळासाहेब दळवी, रामदास लोणकर, संपत जाधव, प्रशांत खैरे, शंकर खैरे, सोमनाथ फरांगडे तसेच काही ग्रामस्थांच्या सह्या करून निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद