श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने दिव्यांगांना दिवाळीसाठी शिधा वाटप

0



शिरूर / प्रतिनिधी : किरण चौधरी

    शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथिल श्री. सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने कोजिगिरी पौणिमेच्या निमित्ताने शिरूर शहरातील प्रहार दिव्यांग बांधवाना दिवाळीसाठी शिधा वाटप करण्यात आले यामुळे या दिव्यांग बाधवांची दिवाळी गोड होणार आहे.

         याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांसाठी विविध खेळ घेऊन भरघोस बक्षिसे देण्यात आली. यामध्ये तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची, बकेट मध्ये बॉल टाकणे अशा स्पर्धो घेण्यात आल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने दर महिन्याला विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आलेल्या सर्व भाविकांसाठी पार्वती फाउंडेशन पुणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


हे पण वाचा: 

संजय गांधी योजनेसाठी वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला ग्राह्य धरला जाणार : निलेश वाळुंज

       यावेळी उद्योजक व पार्वती फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब जासुद, माजी प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश साहेब, जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, आम आदमी पार्टीचे शिरूर शहराध्यक्ष डांगे, मोटेवाडी गावचे माजी सरपंच जीवन जासुद, अँड हेमलता जासुद, प्रहार दिव्यांग संघटना शिरूरचे शहराध्यक्ष मनिष सोनवणे, मोटेवाडीचे ग्रा. पं सदस्य शंकर येलभर, संतोष चोरमले, रोहिदास बढे, संदिप जाधव, सुषमा वाळके, गणेश खोल्लम, संजय कारखिले,  झानेश्वर काळे यांच्यासह परिसरातील महिला व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन बढे यांनी केले

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top