मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाचा शिरुर शहरात भव्य कॅडल मार्च

0

 


हे पण वाचा : शिरूर : श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने दिव्यांगांना दिवाळीसाठी शिधा वाटप

शिरूर / प्रतिनिधी : किरण चौधरी

        मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे, या प्रमुख मागणी सह मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आमरण उपोषण सुरु केलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी समस्त सकल मराठा समाज, शिरूर यांच्या वतीने कॅडल मार्च काढण्यात आला. या मध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा कॅडल मार्च सुरु झाला. पुणे नगर रस्त्याने शिरूर बसस्थानक, शिवसेवा मंडळ, हुतात्मा स्मारक या मार्गाने हा मार्च शिरूर तहसील कार्यालयावर गेल्या. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्कांचे अश्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव, सकल मराठा सामाजचे नेते रूपेश घाडगे,रमेश दसगुडे,जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष संजय बारवकर, शिरुर प्रवासी संघटेनेचे अध्यक्ष अनिल बांडे, समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त रमेश दसगुडे, योगेश महाजन, स्वप्निल रेड्डी, महेंद्र येवले, संपत दसगुडे, नीलेश नवले, शिरूर शहर नेते, सागर नरवडे, रामभाऊ इंगळे, अशोक कदम, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधव, सह्याद्री प्रतिष्ठानचे कुणाल काळे, आम आदमी पक्षांचे अनिल डांगे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, वात्सल्य सिंधु संघटनेच्या अध्यक्षा जयश्री लंघे, सचिव उषा वाखारे, आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे, शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख गणेश जामदार, शिवसेनेच्या नेत्या विजया टेमगिरे, आखिल भारतीय मराठा महासंघाच्या वैशाली गायकवाड, पुष्पा आंबेकर, उर्मिला फलके, साधना शितोळे, वत्सला पाचंगे, शिरुर नगरपरिषदेचे माजी सभापती अभिजीत पाचर्णे, माजी सरपंच प्रकाश थोरात, कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष ॲड.किरण आंबेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी सरपंच महेश गोरडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, प्रियंका धोत्रे, सुरेखा चिकणे (भोस ), नोटरी रवींद्र खांडरे, ॲड.संजय ढमढेरे, बिजवंत शिंदे, शिवसेनेचे नेते खुशाल गाडे, अविनाश जाधव, तर्डोबावाडीचे माजी उपसरपंच गणेश खोले, शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी कॉग्रेसचे हाफीज बागवान, राहील शेख, राजुद्दीन सय्यद, नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष रणजीत गायकवाड, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर,शैलेश जाधव, निवेदक रावसाहेब चक्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक वरीष्ठ उपाध्यक्ष कलिम सय्यद, दगडू घोगरे, सिद्धांत चव्हाण, आसिफ शेख, मुश्ताक शेख, लोकेश  शर्मा, प्रणव घाडगे, अक्षय गायकवाड, दिनेश मांडगे, सुनील इंदुलकर, अशोक कदम, संदीप कदम, प्रसाद घारगे, सौरभ कदम, संदीप कदम आदी उपस्थित होते. कॅडल मार्च तहसिल कार्यालयावर पोहचल्यावर मागील ६ (सहा) दिवसापासून तहसिल कार्यालयाचा आवारात उपोषणास बसलेले भाउसाहेब चौधरी यांची भेट घेऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करण्याची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे निवेदन पोलीस उपविभागीय आधिकारी यशवंत गवारी व तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top