निघोज / प्रतिनिधी: सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शेळके यांची कन्या विद्या शेळके हिची बजाज फायन्सास कंपनीत उच्च पदावर निवड झाली आहे.
विद्या शेळके ही संगमनेर मधील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात एम. बी. ए च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असताना आर्थिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बजाज फायन्सास कंपनी त उच्च पदावर मोठ्या आर्थिक पगारावर निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कार्पोरेट जगाच्या विविध वाटा माहिती होण्यासाठी शिक्षण घेणे, ही काळाची गरज बनली आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलांमध्ये मुली ही वरचढ ठरल्याच्या दिसून येतात. निघोज सारख्या ग्रामीण भागातून संगमनेर मधील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित असलेले अमृत वाहिनी आभियांत्रिकी महाविद्यालयात एम.बी. ए च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असताना च व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिची बजाज फायन्सास कंपनीत निवड झाल्याने तिच्या उत्तुंग यशाचे निघोज परिसरातून कौतूक होत आहे. तिच्या कौतुकास्पद यश इतरांनी अंगीकारण करण्यासारखे आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद