दिवाळी सणा पूर्वी पाटोदा नगरपंचायतने रस्त्यावरील पोलवर विद्युत दिवे बसवून शहर प्रकाशमय करावे- नगरसेवक बाबुराव जाधव

0

पाटोदा:

        देशातील सर्वात मोठा सण दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठेत व नगरपंचायत हादीतील रस्त्यावरील पोलवर विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार पडत असल्याने यांचा फायदा घेत चोर चोऱ्याही करु शकतात तसेच दिवाळी सणा निमित्त लोक खरेदी साठी बाहेर निघतात बाहेर गावावरून ही नागरिक मोठ्या संख्येने शहरात येतात अंधार असल्यामुळे अपघात होऊ शकतात यामुळे तात्काळ पाटोदा नगरपंचायतने नगरपंचायत हदीतील रस्त्यावरील विद्युत पोलवर विद्युत दिवे नाहीत त्या भागात नगरपंचायतने तात्काळ विद्युत दिवे बसवून दिवाळी सणा पूर्वी पाटोदा शहर प्रकाशमय करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक बाबुराव आबा जाधव यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top