माणसाचे तारुण्य व मिळालेली सत्ता वाईट नसते, पण त्यातील अहंकार रूपी मध वाईट असते.- रामायणाचार्य रामराव महाराज ढोक

0

Photo- Jaysing Harel

निघोज / प्रतिनिधी : सागर आतकर

      निघोज येथील मळगंगा सामुदायिक तुळशी विवाह मंडळाला १२ वर्षे, तपपुर्ती झाल्याच्या निमित्ताने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतील आठ दिवसांच्या रामायण कथेचे आयोजन कपिलेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आले असून सुरुवातीला दररोज सायंकाळी ५ ते ६ वाजता हरीपाठ, ६ ते ६ .१५ वाजेपर्यंत हनुमान चालीसा, ६.१५ ते ६. ३० वाजेपर्यंत ग्रंथ पुजन व महा आरती घेण्यात येते.

यावेळी रामायणाचार्य रामराव ढोक महाराज पहिले पुष्प गुंफताना पुढे म्हणाले की, माणसाचे तारुण्य व मिळालेली सत्ता वाईट नसते, पण त्यातील अहंकार रूपी मध वाईट असते. रामायण कथा ही फक्त ऐतिहासिक कथा नसून आपल्या जीवनाची कथा आहे. 

पद व मध यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, ज्यावेळी एखाद्याला पदाचा अहंकार निर्माण होतो. त्यावेळी त्या पदाचे मधात रूपांतर होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायण कथाकार, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी निघोज येथे रामायण कथा सांगताना पहिल्या पुष्पात केले आहे.

धनाचे राजा, धर्म, अग्नी, चोर हे चार वाटेसरू असतात. गुजराती समाजातील लोकांकडे धन थांबते, कारण ते आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजासाठी काढून ठेवतात म्हणून त्यांच्याकडे धन राहते. 

ज्याच्यात भय नाही, त्याच्यात प्रेम आणि भय एकत्र येऊ शकत नाही. संसार रुपी बैलगाडीचे एक चाक निखळले की, त्या बैलगाडीची प्रतिष्ठा पणाला लागते, तद्वतच मनुष्याच्या संसाराचेही आहे. 

कोणत्याही गोष्टीत श्रद्धा ठेवा, जेथे श्रद्धा आहे, तेथे संत येतात. काम, क्रोध, लोभ ही नरकाची तीन दारे आहेत, असे ही रामायण रूपी किर्तनात ह.भ.प रामराव ढोक महाराज यांनी सांगितले आहे. 

यावेळी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निघोज मधील लष्करातील जवानांचा व मातृ - पितृ पुजन सोहळा संपन्न झाला. या रामायण कथा कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, मळगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, विश्वस्त शिवाजीराव वराळ, प्रसिद्ध उदयोजक अमृता रसाळ, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, निघोज पतसंस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव थोरात, तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके, आपला गणपती मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, शिवबा संघटनेचे पदाधिकारी राजू लाळगे, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर व मोठ्या प्रमाणावर निघोज पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला, पुरुष उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top