खुश खबर..खुश खबर..शिरूरकरांची पीएमपीएमएलची प्रतिक्षा आता संपली

0
अखेर शुभमुहूर्त लाभला शिरूरला पीएमपीएमएल बस सेवा सुरु

शिरूर / प्रतिनिधी: किरण चौधरी

         शिरुरला पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी, नागरिक व विविध संस्था संघटनांच्यावतीने मागणी होत होती, याबाबत महाराष्ट्र दर्शन न्यूजने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असल्याने अखेर शिरूरकरांची प्रतिक्षा संपली असून आज शुक्रवारपासून पीएमपीएमएल सेवा करण्यात येणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून  माहिती देण्यात आली.



       रांजणगाव ते शिरुरपर्यंत एस.टी.बस थांबत नसल्याने अनेकांची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. याबाबत हजारो विद्यार्थ्यांचा पत्र व्यवहार, शिरूर पंचायत समिती, शिरूर नगरपरिषद, सरदवाडी ग्रामपंचायत, कर्डिलेवाडी ग्रामपंचायत, शिरूर ( रामलिंग ) ग्रामपंचायत आदींसह सी.टी.बोरा महाविद्यालय, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, विद्याधाम प्रशाला शिरूर, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, भ्रष्टाचार मुक्त शिरुर अभियान, ग्राम स्वराज्य अभियान, मंगलमूर्ती स्वयंरोजगार सेवा स.संस्था, राष्ट्रीय किसान मजदूरी महासंघ आदींसह विविध संस्था संघटनांच्यावतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, शेतकरी संघटनेचे नितीन थोरात यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला पत्र देऊन कारेगावपर्यंत सुरू असलेली पीएमपीएल बस सेवा पुढे शिरूरपर्यंत सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची सकारात्मक दखल घेत शुक्रवार दि.१० रोजीपासून सकाळी ७.४० वा.सार्वजनिक बांधकाम विभाग मैदान, जोशीवाडी, शिरूर ते वाघोली बस सुटणार आहे. 

तरी या पीएमपीएमएल बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घेण्याचे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top