संदीप पाटील गोरगरीबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम मंगळवार दि. १४ रोजी निघोज येथील कपिलेश्वर मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता संपन्न होत असल्याची माहिती निघोज ग्रामस्थांनी दिली आहे. या सामाजिक उपक्रमाचे हे १० वे वर्ष आहे. माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ पाटील यांनी व त्यांच्या सहकान्यांनी हा उपक्रम सुरू केला होता. गेली सात वर्षांपूर्वी या सामाजिक सेवाभावी कामाची जबाबदारी घेऊन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजपर्यंत हा उपक्रम अव्याहतपणे सुरू ठेवला आहे. मंगळवार दि. १४ रोजी संपन्न होणान्या या कार्यक्रमात दोन हजार कुटुंबांना दिवाळीचा आनंद देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. यामध्ये महिला भगीनींसाठी साडी व मिठाई तसेच ज्येष्ठ मंडळींचा शाल व मिठाई देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
निघोज, मुंबई, पुणे अन्य शहरात स्थायिक झालेले निघोज येथील ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यामध्ये मदतीच्या माध्यमातून या सेवाभावी कार्यात सहभागी होत असतात. यामध्ये ग्रामस्थां बरोबरच वराळ पाटील कुटुंबाचे योगदान मोठ्या प्रमाणात असते. चार ते साडेचार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
खर्च किती होतो यापेक्षा जवळपास निघोज व परिसरातील हजारो गोरगरीबांना दिवाळीचा आनंद साजरा करण्याची जी संकल्पना नऊ वर्षांपूर्वी माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप वराळ पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मंदीरात सुरु केली. तोच समाजसेवेचा वारसा सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु ठेवला आहे ही कौतुकास्पद बाब सेवाभावी कार्याला प्रेरणा देणारी असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद