धारीवाल परिवाराकडून गोर गरीब कुटुंबाना मिठाई वाटप

0



शिरुर / प्रतिनिधी : किरण चौधरी

         दिपावली या सर्वात मोठ्या सणाचा आनंद गोरगरीबांना देखील साजरा करता यावा तसेच या गरीबांचे तोंड गोड व्हावे म्हणून  माणिकचंद उद्योग समुहाचे प्रसिध्द उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारीवाल व आदित्य धारीवाल यांनी शहरात रहाणाऱ्या गोर् गरीब कुटुंबांना तसेच सर्टिफाईड हायस्कूल येथे मिठाई वाटप करण्यात आली. धारिवाल परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या परंंपरेेचे जतन करत सर्व नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, संजय देशमुख, दादाभाऊ वाखारे, मुजफ्फर कुरेशी, निलेश लटांबळे, प्रविण दसगुडे, शरद कालेवार, शिवसेना मंडळ ट्रस्टचे मनसुख गुगळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, अशोक पवार, मुन्ना शेख, विनोद धाडीवाल, सुभाष गांधी, प्रशांत शिंदे, दिपक तातेड, सागर नरवडे, माऊली घावटे, निलेश जाधव, वसिम सय्यद, बंटी जोगदंड यांसह नागरिक उपस्थित होते.

      दिवाळी सणाचा आनंद गरीबांना देखील साजरा करता यावा व गरीब कुंटूंबातील नागरिक या मोठ्या सणाच्या आनंदा पासून वंचित राहु नये या उद्देशाने व सामाजिक बांधिलकी जपत गरीबांच्या चेहऱ्यावर देखील हसु फुलविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष स्व.रसिकलाल धारिवाल यांचे कुंटूंब दिपावलीच्या दिवशी मिठाई वाटप करुन करत असतात. दातृत्वाचा हा वारसा अखंडीतपणे सुरू ठेवत दिपावलीच्या दिवशी सकाळपासूनच सभागृहनेते प्रकाश धारिवाल, आदित्य धारीवाल यांसह आजी माजी नगरसेवक समाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः शहरातील गोर गरीबांना मिठाईचे वाटप करून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top