शिरुर जोशिवाडी येथून मा. नगरसेवकांनी केला पीएमपीएमएल बस ने प्रवास

0



शिरूर / प्रतिनिधी : किरण चौधरी

          शिरूर शहरातून पीएमपीएमएल बस सेवा सुरु करावी अशी मागणी शाळा, कॉलेज, अनेक संस्था, संघटना तसेच नागरिकांकडून होत होती. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेत शुक्रवार पासून शिरूर शहरातून  पीएमपीएमएल बस सुरु करण्यात आली. रांजणगाव पासून पुढे शिरूरपर्यंत बस थांबत नसल्याने अनेकांची गैरसोय होत होती. शुक्रवार (दि.१०) रोजी पासून सकाळी ७.४० वा. सार्वजनिक बांधकाम विभाग मैदान जोशिवाडी या ठिकाणा पासून ते वाघोली पर्यंत ही बस सेवा सुरु करण्यात आली आणि शिरूरकरांची पीएमपीएमपीएल ची प्रतीक्षा संपली.

याच अनुषंगाने जोशिवाडी येथून मा.नगरसेवक दादाभाऊ वाखारे, निलेश लटांबळे यांनी पीएमपीएमएल चा प्रवास करत प्रवासी नागरिक यांच्यासह जोशिवाडी शिरूर येथून प्रवास करत आनंद व्यक्त केला तसेच चालक व वाहक यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. नगरसेवक दादाभाऊ वाखारे, निलेश लटांबळे, मा.सरपंच मोहन पवार, निळकंठ सालके, महाराष्ट्र बँक अनिल सोनवणे, जिजामाता बँकेचे बाळासाहेब गायकवाड, डॉ. धनेश दिवटे, अरुण पाटील, राजेंद्र भोसले, मोहन पडवळ, प्रशांत पवार, अविनाश नगरे, दीपक टोणगे, दिपक गायकवाड, बाबा भुजबळ, राहुल वेताळ, ऋषिकेश कातोरे, अक्षय भवर, रामभाऊ रसाळ, नितीन गोंणटे यांसह नागरिक प्रवासी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top