निघोज / प्रातिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार याच्या हस्ते कंट्री क्राप्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना २५ ट्रॅक्टर माफक दरामध्ये वितरित करण्यात आले.
याप्रसंगी कंपनीचे तालुक्यातील मुख्य वितरक संकेत लाळगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रस्ताविक करताना कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त औजारे व शेती साहित्य माफक दरात कशाप्रकारे माफक दरात मिळतात याविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे होते.
या परिसरात कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. कांद्याला भाव येईल म्हणून थांबतात मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाव मात्र मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचा व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी कंट्री क्राप्स कंपनीच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबविले जातात. संकेत लाळगे व विनय लंके या युवकांनी मार्गदर्शन घेऊन कंपनीच्या माध्यमातून एक व्यवसाय सुरू केला आहे यामध्ये हे तरुण नक्कीच यशस्वी होतील. अशा प्रकारे मराठी माणसाने नवीन उद्योगाच्या माध्यमातून पुढे येण्याची गरज आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकरी हिताचा कोणताच निर्णय घेत नाहीत. पेट्रोल, गॅस व इतर गोष्टींच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता या महागाईत भरडली जात असून यासाठी जनतेने संघटित होण्याची गरज- रोहित पवार (कर्जत-जामखेडचे आमदार )
यावेळी कार्यक्रम प्रसंगी उद्योजक संकेत लाळगे, विनायक जगदाळे, विवेक लंके तसेच लाळगे याच्या सहकाऱ्यांच्या हस्ते आमदार रोहित पवार यांचा तसेच व्यसपीठावरील मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आला.
कंट्री क्राप्स कंपनीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवून शेतीविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू - उद्योजक संकेत लाळगे
या कार्यकमाप्रसंगी सकाळचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील, मुंबई उपनगरचे निवासी जिल्हाधिकारी संदीप निचीत, महिंद्रा ट्रॅक्टरचे स्टेट हेडस स्वप्नील जोशी, सेल्स चीफ फार्मट्रॅक भालचंद्र माने, सकाळ प्रोजेक्ट हेड रवी काटे, राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, माजी महापौर अभिषेक कळमकर, कन्हैय्या दूध उद्योग समूहाचे आधीकाश शांताराममामा लंके, कन्हैय्या अग्रोचे सुरेश पठारे,राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी सभापती गणेश शेळके, माजी सरपंच दामू घोडे, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेव थोरात, निघोज उपसरपंच ज्ञानेश्वर( माऊली ) वरखडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे सचिन वराळ, अस्लम इनामदार, विवेक लंके, विनायक जगदाळे तसेच तालुक्यातील व निघोज परिसरातील विविध संस्थानचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच परिसरातील ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद