निघोज / प्रतिनिधी : सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथे संदीप पाटील गोरगरिबांची दिवाळी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संदीप पाटील गोरगरीबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम गेली दहा वर्षांपासून होत असून यामध्ये पत्रकार मित्रांचे मोठ्या प्रमाणात योगदान- सचिन वराळ पाटील (संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष तथा निघोज अळकुटी जिल्हा परिषद गट)
संदीप पाटील गरिबांची दिवाळी या सामाजिक उपक्रमात पत्रकार मित्रांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष तथा निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सचिन वराळ पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक सुनिल दादा पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, संदीप पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पा वराळ, निवृत्ती वरखडे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर यांच्या हस्ते पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्कर कवाद, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख विजय रासकर, सह्याद्री न्यूज चॅनलचे पत्रकार जयसिंग हरेल, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुरेश खोसे पाटील, सचिव बाबाजी वाघमारे, यांचा सत्कार करण्यात आला.
गेली दहा वर्षात हजारो गोरगरीबांना दिवाळीचा आनंद मिळवून देण्याचे काम संदीप पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. गेली सात वर्षांपासून सचिन वराळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत सर्वसामान्य जनतेसाठी योगदान दिले आहे.- सुनिल पवार (मुंबई बॅंकेचे अधिकारी तथा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक)
पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिवाळी या उपक्रमात मोठे योगदान दिले आहे. उनवणे साहेब यांचे मार्गदर्शन सर्वाधिक महत्वाचे असून त्यांनी गेली दहा वर्षात आम्हाला अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करुन विकासाबाबत महत्वपूर्ण भुमिका बजावून गाव व परिसरातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.- मंगेश लाळगे (तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच माऊली वरखडे यांनी केले. शेवटी सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी आभार मानले
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद