पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. नागरिकांची होत असलेली गौरसोय लक्षात घेता आता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये उद्यापासून (ता. ५) जड वाहनांना नो एन्ट्री आहे. पुण्यातून बाहेर असल्यास देखील आता कोणत्याही जड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाहीये.
पर्यायी मार्ग उपलब्ध
पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून एकाही जड वाहनाला या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही. जड वाहनांना वाघोली ते पुणे शहराच्या दिशेनं २४ तास प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे तसेच नगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे. सोलापूरला जाण्यासाठी थेऊर फाटा इथून पुढे लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गे पर्यायी मार्ग आहे. पुणे सासवड असा प्रवास करणाऱ्या जड वाहनांसाठी हडपसर मार्गे थेऊर फाटा येथून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. येथून लोणीकंद आणि शिक्रापूर मार्गाने देखील जड वाहनांना प्रवास करता येणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद