शिरूर- प्रतिनिधी :किरण चौधरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, तालुका उपाध्यक्ष अण्णासाहेब दौंडकर, तालुका उपाध्यक्ष, ऋतिक शितोळे, शिरूर शहर उपाध्यक्ष शुभम गिरे, शिरूर शहर उपाध्यक्ष गौरव शिंदे, विभाग अध्यक्ष जि. प. गट निलेश बाहेती, विभाग अध्यक्ष जि. प. गट अभिजीत पवार यांच्या निवड करण्यात आली असून तसे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी दिले. तालुका उपाध्यक्ष, तालुका विभाग अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष यांची निवड झाल्याबद्दल मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे, माजी तालुकाध्यक्ष अनिल कोल्हे, तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष अदित्य मैड, सचिव रविराज लेंडे, संतोष नरके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णासाहेब दौंडकर, ऋतिक शितोळे, शुभम गिरे, गैरव शिंदे, निलेश बाहेती व अभिजीत पवार यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेऊन त्यांची निवड विविध पदांवर करण्यात आली असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी सांगितले. पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा स्थापन करणे व त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे देखील सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद