पारनेर / रांधे (प्रतिनिधी : सागर आतकर )
पारनेर तालुक्यातील रांधे येथील पांडुरंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या संत श्री. बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी जिथे प्रकट झाली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी, तमाम वारकरी विठ्ठलभक्तांची प्रतिपंढरी श्री. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी येथे वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने, सालाबादप्रमाणे याही वर्षी विठ्ठलवाडी येथे स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्त विठ्ठलवाडीकर रांधे यांच्या संयुक्त विद्यमाने देवषयनी आषाढी एकादशी उत्सव सोहळा रविवार दि,१७ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठ्ठलभक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ ग्रामस्थ रांधे विठ्ठलवाडीकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
पहाटे ४:३० - अभिषेक आणि महापूजा.काकडआरती
अभिषेक मानकरी - श्री. नितीनशेठ शंकर साबळे आणि सौ विद्या नितीनशेठ साबळे.
सकाळी ८ ते १२ - विठ्ठलवाडी ते रांधे ते विठ्ठलवाडी पायी दिंडी सोहळा.
दुपारी १ ते ३- ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसन नगर ठाणे यांचे सुश्राव्य भजन आणि गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत.
संध्या.५ ते ७- हरिपाठ
रात्री ७ ते ९ - ह भ प. अमोल महाराज गहाणडुले यांचे हरी कीर्तन.
रात्री ९ वा. एकादशी भोजन फराळ.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद