जुन्नर, पारनेर व शिरुर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा

0


महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर:

                निघोज कुकडी प्रकल्पात वडज, येडगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने कुकडी नदीपात्रात २८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी वाहू लागली असून, निघोज (ता. पारनेर) येथील रांजणखळगेही पाण्याने खळाळले आहे.

कुकडी नदीपात्रात २८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जुन्नर, पारनेर व शिरुर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या कुकडी प्रकल्पाच्या धरणांमध्ये सरासरी ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी धरणांतील पाणीसाठा समाधानकारक होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. नदी वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांतील पाणीप्रश्नही मार्गी लागणार आहे. आता वरील धरणे भरल्याने नदी पावसाळ्यात वाहती राहील. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल. अनेकदा पावसाळ्याच्या अखेरीस धरणे भरतात. त्यामुळे नदीपात्रातही त्याचवेळी पाणी येते. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कुकडी नदी दुथडी वाहू लागली आहे. कुकडी नदीपात्रात पाणी सोडल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top