श्री. मुलिकादेवी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी नुतन अनिल चौधरी हिची मुंबई पोलीस दलात निवड

0

मुलिकादेवी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी नुतन अनिल चौधरी हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर 

निघोज : श्री. मुलिकादेवी महाविद्यालय, निघोज येथे माजी विद्यार्थिनी कु. नुतन अनिल चौधरी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कु. नुतन यांनी नुकतेच पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून मुंबई पोलिस दलात यशस्वीरीत्या रुजू झाल्या आहेत. त्यांचा हा उल्लेखनीय प्रवास महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते. त्यांनी कु. नुतन यांचे कौतुक करताना त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि जिद्दीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. 

डॉ. आहेर यांनी सांगितले की, नुतन यांनी आपल्या शिक्षण प्रवासात जिद्द आणि समर्पण दाखवून मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत, जे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. कु. नुतन चौधरी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडीलांना दिले. तसेच त्यांनी आपल्या यशस्वी प्रवासात महाविद्यालयाच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला आणि आपल्या अनुभवाचे सादरीकरण केले. 

या प्रसंगी पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. अनिल चौधरी, डॉ. मनोहर एरंडे, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. दुर्गा रायकर, प्रा. आनंद पाटेकर, डॉ. गोरक्षनाथ घोलप, प्रा. स्वाती मोरे, प्रा. सचिन निघुट, प्रा. स्वाती पवार, श्री. प्रवीण सरडे, प्रा. हर्षदा पंडित, प्रा. वृषाली जगदाळे, श्री. नवनाथ घोगरे, श्री. संदीप लंके, श्री. अक्षय घेमुड, श्री. किशोर बाबर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. नुतन गायकवाड यांनी केले, तर प्रा. मनीषा गाडीलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी नुतन अनिल चौधरी हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top