महाराष्ट्र दर्शन न्यूज । पारनेर प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील स्वयंभु श्री. अंबिका देवीचे हे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी माहूरची श्री. रेणुकामाता तादुळाकार पाषाण मूर्तीच्या दक्षिणाभिमुख स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली आहे.
दक्षिणेकडे मुख असलेली देवस्थाने जागृत असल्याचे मानण्यात येते.
देवीची मूर्ती संपूर्ण पितळी आहे. देवीच्या आठही हातामध्ये दैत्यांचा सहार करणारी शस्त्रे आहेत. नवरात्र उत्सवात मंदिरात आणि परिसरात आरतीचा आनंद घेण्यासाठी व देवीची आराधना करण्यासाठी हजारो महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी सप्तशती पाठ व देवीस्त्रोत्र व श्री. सुक्त या अभिषेकाने घटस्थापना केली जाते. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात झेंडू, मुखवटे व शेजारी गोवराई व कांजण्या आई यांचे मुखवटे असून देवीसमोर हजारो नंदादीप लावण्यात येतात. दररोज आरती छबिना आदी नित्यनेमाने होत असतात. राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या या अंबिका मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नवरात्रात भाविक येत असतात. नवरात्र उत्सवात देविभोयरे ग्रामपंचायत व ग्रामस्थ भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी अतिशय परिश्रम घेतात.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद