पाहिल्या दिवशी ९ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले; पारनेर मतदारसंघात कोणी घेतले अर्ज वाचा...

0



पारनेर । महाराष्ट्र दर्शन न्यूज

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास मंगळवार पासून सुरूवात झाली. पारनेर मतदार संघात यावेळी पाहिल्या दिवशी एकूण ९ उमेदवारांनी १९ अर्ज नेले आहेत. त्यामध्ये प्रमुख उमेदवारांपैकी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांच्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीने तिन अर्ज घेतले आहेत. दरम्यान मंगळवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

अर्ज घेतलेल्या उमेदवारांमध्ये पारनेर येथील भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी स्वतः अर्ज घेतला आहे. (विळद, ता. नगर) येथील अमोल शिवाजी कांबळे यांच्यासाठी अजय शिवाजी कांबळे यांनी अर्ज घेतला, हंगे येथील दिनेश सुभाष बोरूडे यांनी राणी निलेश लंके यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून तिन अर्ज घेतले. पिंपळगांवरोठा येथील चंद्रकांत राजाराम कुलकर्णी यांनी सुजित वसंतराव झावरे यांच्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी पक्षासाठी दोन तर अपक्ष म्हणून एक अर्ज खरेदी केला आहे.


Litehom Outdoor String Lights, 16.5 Feet 40 LED Lights with Remote 8 Modes Battery Operated Ball Fairy Light for Bedroom, Xmas Tree, Decor, Diwali Decpration Light (Warmwhite 40 Ball with Remote)


निघोज येथील अनिल शिवाजी शेटे यांनी डॉ. पद्मजा श्रीकांत पठारे यांच्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षासाठी एक तर अपक्ष म्हणून एक अर्ज खरेदी केला आहे. रांधे येथील संतोष भाउसाहेब साबळे यांनी डॉ. श्रीकांत तान्हाजी पठारे यांच्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी २ तर अपक्ष म्हणून १ अर्ज घेतला. राळेगणसिध्दी येथील किसन मारूती पठारे यांनी स्वतः साठी अपक्ष म्हणून दोन अर्ज खरेदी केल्याची माहिती तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

मा. आ. विजय औटी यांच्यासाठीही अर्ज
विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजय भास्करराव औटी यांच्यासाठी पारनेर येथील संतोष सिताराम चेडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज खरेदी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर औटी हे अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. औटी यांच्यासाठी अर्ज खरेदी करण्यात आल्याने सोशल मिडियावरील चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top