किराणा गोडाऊन आगीत जळून खाक

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज : अहिल्यानगर अपडेट

बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉन शेजारी असलेल्या किराणा गोडाऊनला मंगळवारी (ता.३) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन विभागाच्या वतीने ही आग आटोक्यात आणली होती. बुधवारी (ता.४) सायंकाळी पुन्हा गोडाऊन मधील आग धुमसू लागल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 रात्री १२ च्या सुमारास गोडावूनला अचानक मोठी आग 

बुरूडगाव रोडवर नक्षत्र लॉन शेजारी आनंद शिंगी व सचिन शिंगी यांच्या मालकीचे एस एस मार्केटिंग या फर्मचे गोडावून आहे. शिंगी बंधूंकडे ८ ते १० कंपन्यांच्या मालाच्या एजन्सी असून या ठिकाणाहून ते संपूर्ण जिल्हाभरात किराणा दुकानांना या मालाचा पुरवठा करतात. मंगळवारी (ता.३) रात्री शिंगी बंधू व गोडावूनमध्ये काम करणारे कामगार हे गोडावून बंद करून घरी गेल्यानंतर रात्री १२ च्या सुमारास गोडावूनला अचानक मोठी आग लागली. अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पाण्याचा मारा सुरु करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग सारखी भडकत होती. त्यामुळे एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा गोडाऊनमध्ये आग धुमसू लागल्याने अग्निशमन विभागाने पुन्हा आग आटोक्यात आणली.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top