दुदैवी! अपघातात माय-लेकाचा मृत्यू; अहिल्यानगर मधील घटना

0



अहिल्यानगर। महाराष्ट्र दर्शन न्यूज -

जिल्ह्यातील बीड-पाथर्डी राज्य महामार्गावर शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ पुंडलिक खेडकर (वय २०), ताराबाई पुंडलिक खेडकर (वय ६०, रा. करोडी, ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.

शुक्रवारी(दि. ६) रोजी दुपारी सोमनाथ आपल्या ताब्यातील दुचाकी वरुन आई ताराबाई हिला घेउन धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. तो कार्यक्रम उरकून पाथर्डीहून करोडीकडे दुचाकीवरून जात असताना कारेगाव येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मोहटा देवीकडून येणाऱ्या (एमएच १६.बी. एच. ३१५२) चारचाकी वाहनाने माय- लेकाचा दुचाकीला जोरदार धडक दिली.

इतकाभीषण होता की, आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली. या गाडीतील ही प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top