जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्वरांजलीला मिळाली संधी

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी -सागर आतकर

गायन स्पर्धेत निघोज जिल्हा परिषद शाळेची दुसरीची विद्यार्थींनी स्वरांजली रोहन उनवणे हिचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून स्वरांजलीला जिल्हा स्तरावर होणाऱ्या विविध गुणदर्शन स्पर्धेत गायनाची संधी मिळाली आहे. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथे झालेल्या तालुका स्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत गायन स्पर्धेत निघोज जिल्हा परिषद शाळेची दुसरीची विद्यार्थींनी स्वरांजली रोहन उनवणे हिचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून स्वरांजलीला जिल्हा स्तरावर होणाऱ्या विविध गुणदर्शन स्पर्धेत गायनाची संधी मिळाली आहे. निघोज येथे झालेल्या केंद्र स्तरावर झालेल्या स्वरांजली हिचा प्रथम क्रमांक आला होता. केंद्र प्रमुख बाचकर सर मुख्याध्यापक कैलास शिंदे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष महाराज मगर, शिक्षीका अनिता दिघे, काळे सर, काळोखे सर, सालके मॅडम, कांताबाई मगर मॅडम तसेच सरला व रोहन उनवणे या आई वडील तसेच आजी मंदा दत्तात्रय उनवणे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. कन्हैया लागला तूझा रे छंद मला हे गाणे गात स्वरांजली हिने उपस्थितांची मने जिंकली आहेत. स्वरांजली हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच पारनेर तालुका पत्रकार संघ, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषद मराठी शाळेतील गुणवत्ता अतिशय चांगल्या दर्जाची असून विविध गुणदर्शन स्पर्धा असो की विशेष करुन स्पर्धा परीक्षा असो यामध्ये शाळेतील शिक्षक अतिशय मोठ्या प्रमाणात मेहनत विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहेत.- चित्राताई वराळ पाटील ( सरपंच)

निघोज – जिल्हा परिषद गटातील प्राथमिक शाळांची गुणवत्ता कौतुकास्पद असून केंद्रप्रमुख बाचकर सर व मुख्याध्यापक कैलास शिंदे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच या भागातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी जिल्हा परिषद शाळांचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.- माऊली वरखडे ( उपसरपंच)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top