चिमुकल्यावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / राहुरी अपडेट


राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभाग प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर दोन दिवसानंतर ताहाराबादमध्ये तळ ठोकून बसलेला बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले.

ग्रामस्थांनीसोडला सुटकेचा निश्वास
जगतापवस्तीवर एका शेतात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला. या बिबट्याला डिग्रस नर्सरी येथे हलविण्यात आले. गेले काही दिवसापासून बिबट्यांनी गावातील अनेक जनावरे फस्त केले होते.त्यामुळे ताहाराबाद गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.बिबट्याच्या भितीने शेतकरी शेतात जायला घाबरत होते.आता बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनपाल शेंडगे भाऊसाहेब, वनरक्षक शंकर खेमनर, समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top