अहिल्यानगर उड्डाणपुलावरील वळणावर पुन्हा अपघात

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज : अहिल्यानगर अपडेट

हिल्यानगर उड्डाणपुलावरील वळणावर गुरुवारी (ता. १२)  रात्री ९ वाजेच्या सुमारास उसाचा ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून कलंडला. त्यामुळे ट्रकमधील ऊस उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजेत.


वळणपुन्हा चर्चेचा विषय
घटनेचीमाहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी (ता. १२) रात्री ९ वाजेच्या सुमारास एक उसाने भरलेला ट्रक उड्डाणपुलावरून पुण्याच्या दिशेने निघाला होता. मात्र, उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक वळणावरील कठड्याला धडकला. यात ट्रक एका बाजूने कलंडल्याने ट्रकमधील ऊस उड्डाणपुलावरून खाली पडला. यावेळी उड्डाणपुलाखालील रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे नगर शहरातील उड्डाणपुलावरील वळण पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top