कोंबडया फस्त करायला गेला, बिबट्या खुराडयात अडकला !निघोजच्या कुंडवस्तीवरील घटना

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी - सागर आतकर

दिवसेंदिवस पारनेर तालुक्यातील बिबटयांची संख्या लक्षणीय वाढली असून भक्ष्याच्या शोधासाठी बिबटयांकडून आता मानवी वस्त्याही लक्ष्य केल्या जाऊ लागल्या आहे. असाच भक्ष्याच्या शोधात निघोजच्या लामखडे वस्तीवर आलेला बिबटया कोंबडयांच्या खुराडयात अडकला असून वन विभागाचे कर्मचारी त्यास जेरंबद करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. 

     यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निघोजच्या कुंड परिसरातील कोळीवाडा हॉटेलच्या पाठीमागे गणेश लामखडे यांची शेती आहे. या शेतीमधील उसाच्या फडालगत असलेल्या कोंबडयांच्या खुराडयातील कोंबडयांना बिबटयाने सोमवारी रात्रीच्या सुमारास लक्ष्य केले. कोंबडया फस्त केल्यानंतर खुराडयात उतरलेल्या बिबटयाला बाहेर पडणे मुश्किल झाले. तो बाहेर येणाचा प्रयत्न करत होता, त्याचे प्रयत्न अपुरे पडले.  कोंबडयांच्या खुराडयात बिबटया असल्याचे लामखडे परिवारातील सदस्यांच्या सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लक्षात आहे. खुराडयाबाहेर पडण्याची तो धडपड करत होता. त्यामुळे तिथे जमलेल्या व्यक्तींनी तिथून लांब जाण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांना माहीती देण्यात आल्याने वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top