राणीताई लंके यांचा मतदारसंघात नावलौकिक असल्याने त्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील- माजी सरपंच ठकाराम लंके

0



निघोज । महाराष्ट्र दर्शन न्यूज । प्रतिनिधी : सागर आतकर

निघोज परिसरातील नवी पेठ, जुनी पेठ, मातंग नगर, आंबेडकर नगर, लाळगे वस्ती, तनपुरे वस्ती, काळे वस्ती या ठिकाणी पायी पदयात्रा करीत लंके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रचार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निघोज सोसायटी पदाधिकारी व संचालक मंडळ, निघोज ग्रामपंचायत सदस्य, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्त मंडळ, सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ, लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याने तसेच एक कार्यक्षम महिला उमेदवार म्हणून राणीताई लंके यांचा मतदारसंघात नावलौकिक असल्याने त्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील- माजी सरपंच ठकाराम लंके

माजी सरपंच लंके यावेळी म्हणाले गेल्या पाच वर्षात खासदार नि लेश लंके यांनी मतदारसंघात दोन हजार कोटींची विकासकामे केली आहेत. निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटात शेकडो कोटींची विकासकामे झाली आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषद गटाने साडे दहा हजार पेक्षा जास्त मताधिक्य खासदार लंके यांना दिले होते. यावेळी राणी ताई लंके यांना १२ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य देऊन निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गट मतांचा विक्रम करील असा विश्वास माजी सरपंच लंके यांनी व्यक्त केला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top