निघोज । महाराष्ट्र दर्शन न्यूज । प्रतिनिधी : सागर आतकर
निघोज आणी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघोज येथील पुष्कर लॉन्स येथे दाते यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजपचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच निघोज येथील संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, अॅड. बाळासाहेब लामखडे, रोहिदास लामखडे यांच्या सहीत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. १३ रोजी निघोज येथील संत सेना सभागृहात सचिन पाटील वराळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
प्रभाग क्रमांक सहामधील विशेष करुन लाळगे वस्ती, तनपुरे वस्ती या ठिकाणी प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांनी सचिन पाटील वराळ यांच्या समवेत घरोघर जाऊन दाते यांचा प्रचार करीत महायुती सरकारची भुमिका व त्यांनी दिलेल्या योजनांची माहिती दिली. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी यावेळी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ दाते गेली चाळीस वर्षे राजकारणात सक्रिय असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या पदाच्या माध्यमातून चांगले विकासाचे कामे केली. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समीतीचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात शेकडो कोटींची विकासकामे केली आहेत. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने दाते सर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असून दाते यांना निवडून देण्याचे आवाहन सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद