निघोज । महाराष्ट्र दर्शन न्यूज । प्रतिनिधी : सागर आतकर
निघोज येथे शकुंतलाबाई लंके यांनी वीस ते बावीस महिलांना बरोबर घेऊन दिवसभरात तीन हजार पेक्षा जास्त मतदारांशी संपर्क साधला आहे. राणी लंके यांच्या सासूबाई शकुंतलाबाई लंके यांनी निघोज व परिसरातील गावात मंगळवार दि. १२ रोजी दिवसभरात तब्बल तीन हजार पेक्षा जास्त मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा करीत प्रचाराची राळ उडवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके सध्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करीत असून लंके यांच्यासाठी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते व महिला भगीनी प्रचारासाठी जिवाचे रान करीत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी या मातोश्रीने प्रचार करीत उपस्थीतांचे लक्ष वेधले आहे. लंके कुटुंबातील सर्व सदस्य सध्या सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत राणीताई लंके यांचा प्रचार करीत आहेत. तब्बल पंधरा तास दिवसभरात प्रचार करीत तरुणांनाही लाजवेल असे काम ते प्रचाराच्या माध्यमातून करीत आहेत. निघोज येथे शकुंतलाबाई लंके यांनी वीस ते बावीस महिलांना बरोबर घेऊन दिवसभरात तीन हजार पेक्षा जास्त मतदारांशी संपर्क साधला आहे. यावेळी लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी शिवाजीराव लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त व खासदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके, ग्रामपंचायत सदस्या भावना साळवे, ग्रामपंचायत माजी सदस्या जया ढवळे या त्यांच्या समवेत होत्या.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद