महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी : सागर आतकर
"निवडणुका आल्या की मतदारांची कडकी झाल्यानंतर लाडकी बहीण आठवते" निघोज येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राणीताई लंके बोलत होत्या. अहिल्यानगर महानगरपालिका नगरसेवक व शिवसेनेचे युवा नेतृत्व योगीराज गाडे या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी निघोजच्या नवी पेठ,जूनी पेठ ते मळगंगा मंदीर अशी खासदार लंके व उमेदवार राणी लंके यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निघोज ग्रामस्थांनी खासदार लंके यांचे जोरदार स्वागत करीत राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मंदीरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा सर्वसामान्य जनतेला हितकारक आहे. महिला भगींनीना तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मला पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नियोजन समीती याचा मोठा अनुभव असून खासदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विधानसभेत चांगली कामगिरी करणार असून बुक्याकडे जाण्यापेक्षा गुलालाकडे या, मतदारसंघाचा विकास हाच आपला अजेंडा असून येत्या पाच वर्षांत खासदार व आमदार या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.-उमेदवार राणीताई लंके
आमदारकीच्या कार्यकाळात निलेश लंके यांनी मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. फक्त निघोज गावात शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची विकासकामे झाली असून मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटात मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.- लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिवाजीराव लंके
यावेळी खासदार लंके यांनी माजी आमदार विजय औटी व माजी सभापती काशिनाथ दाते यांचे नाव न घेता जोरदार टिका केली. एकाने पतसंस्थेचा अनियमित वापर करीत ठेवीदारांना अडचणीत आणले असून ड्रायव्हर पतसंस्थेचा, स्वीय सहाय्यक पतसंस्थेचा अशाप्रकारे सर्व काही पतसंस्थेच्या जिवावर करीत पंधरा वर्षे पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व काही मिळवीत सत्तेचा फायदा स्वतः स्वार्थासाठी केला असून दुसरा उमेदवार १२-१३ पेट्रोल पंपाचा मालक असून पैशाच्या जोरावर निवडणूक लढवीत असून यांचे कर्तृत्व काय आहे. हे मतदारसंघातील जनतेला चांगल्याप्रकारे माहित असून आपण सर्वसामान्य जनतेसाठी गेली पाच वर्षात जी विकासाची कामे केली आहेत, तीच आपली खरी शिदोरी असून महाविकास आघाडीचा जाहिरनामा हा सर्व सामान्य जनतेचा विकासाचा जाहिरनामा असून सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेतृत्व लाभदायी आहे. यावेळी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येणार असून राणी लंके या एक लाख मताधिक्य मिळवून विजयी होणार असल्याची खात्री खासदार लंके यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी उमेदवार राणी लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे, माजी सभापती सुदाम पवार, शिवसेना नेते डॉ भास्करराव शिरोळे, लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी शिवाजीराव लंके, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, देवीभोयरे गावचे सरपंच अशोकराव मुळे, युवा नेते किरण कारखिले, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक भिवाशेठ रसाळ, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, शिवसेना नेत्या प्रियंका खिलारी, शिवसेना नेते निलेश खोडदे, माजी उपसभापती खंडूजी भुकन, रांधे गावचे सरपंच संतोष काटे, अळकुटी सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच बाळासाहेब पुंडे, सरपंच दत्तात्रय म्हस्के, भर्तरी काणे, शिवसेना नेते बाबाजी तनपुरे आदिंची भाषने झाली.
खासदार निलेश लंके यांनी गेली पाच वर्षात पारनेर तालुक्यातील जनतेला कुकडी डावा कालव्याचे पाणी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मात्र पुण्याच्या पुढाऱ्यांनी विशेष करुण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुकडीचे पाणी जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अहिल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. यासाठी जामखेड – कर्जत या भागात जे बोगद्याचे काम होणे अपेक्षित आहे. ते लवकर पुर्ण होऊन कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठा निधी मिळण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे काम फक्त खासदार लंके हेच करु शकतात त्यांच्यातच तेवढी धमक आहे कारण त्यांना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशिर्वाद व खासदार सुप्रिया सुळे यांचे पाठबळ आहे.( माजी उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खंडूजी भुकन )
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद