पेट्रोल पंपावर होणार आता ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

0


मुंबई । महाराष्ट्र दर्शन न्यूज
:-

        पारंपारिक रोख व्यवहारांच्या तुलनेत सुविधा, वेग आणि सुरक्षितता यासारखे फायदे देणारे डिजिटल पेमेंट सामान्यतः फायदेशीर मानले जातात. परंतु काही संभाव्य तोटे देखील आहेत, जसे की गोपनीयतेच्या चिंता आणि फसवणुकीचा धोकाही यातून होऊ शकतो. आणि होतात ही सध्याच्या डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाल्याने आपण सर्वत्र ऑनलाइन पेमेंट करतो अगदी पेट्रोल पंपावरही पेट्रोल भरल्यानंतर आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतो. परंतु आता तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाही. महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचे प्रकार घडले आहे.

पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी याबाबत माहिती दिली. यामुळे १० मे पासून ऑनलाइन पेट्रोल पेमेंट घेणे थांबवण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला आहे. विदर्भ, नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाहीत.

अनेक वेळा लोक इतरांचे कार्ड वापरुन किंवा नेटबँकिंग करुन निघून जातात. यानंतर तक्रार करतात आणि व्यव्हार रद्द करतात. यामुळे पेट्रोल पंप मालकांने खूप नुकसान झाले आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनांमुळे पेट्रोल पंपाचे बँक खातेदेखील ब्लॉक करण्यात आले आहे. यानंतर खाती ब्लॉक झाल्यावर व्यवहार देखील होत नाही. यामुळे विदर्भ आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्सने पुढाकार घेत हा निर्णय घेतला आला.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top