मळगंगा देवीच्या यात्रेसाठी निघोजच्या कपिलेश्वर बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यासाठी निर्णय

0

निघोज: राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी निघोजच्या कपिलेश्वर बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याबद्दल गावकरी व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांनी या बैठकीत राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते यांचे अभिनंदन करणारा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उनवणे यांनी हा ठराव मांडला ट्रस्ट सचिव शांताराम कळसकर यांनी अनुमोदन दिले उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात हा ठराव मंजूर केला. गाव व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार संघ तसेच मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यात्रेचे नियोजनावर साधक बाधक चर्चा झाली. यावेळी विज, आरोग्य, महसूल, पोलिस स्टेशन, एस टी परिवहन अशाप्रकारे विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे कोषाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, संघटक रामदास वरखडे, सचिव शांताराम कळसकर, सहसचिव विश्वासराव शेटे, माजी सरपंच ठकाराम लके, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, रमेश वरखडे, रमेश ढवळे, मळगंगा यात्रा समीतीचे पदाधिकारी शिवाजीराव लंके, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्कर कवाद, दिलीप ढवण, सोसायटीचे अध्यक्ष सुनिल वराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश लाळगे, ट्रस्टचे माजी संघटक अँड. बाळासाहेब लामखडे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अनंतराव वरखडे, सोमनाथ वरखडे, विश्वस्त शंकरराव लामखडे, संतोष रसाळ, रोहिदास लामखडे, मंगेश वराळ, अनिल लंके, अशोक वरखडे, बबनराव ससाणे, विठ्ठलराव कवाद, संदीप वराळ, मोहिनी वरखडे आदींनी यात्रेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा केली तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी यात्रा नियोजन व संबंधित विभागाची जबाबदारी यावर उपाययोजना सांगीतली. ट्रस्टचे सहसचिव विश्वासराव शेटे यांनी या बैठकीचे सुत्रसंचलन केले. विश्वस्त संतोषशेठ रसाळ यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top