![]() |
पाटोदा पंचायत समितीची कोट्यवधींची नवीन इमारत धुळखात पडुन; येणाऱ्या १५ ऑगस्टला तरी उद्घाटन होणार का ? |
पाटोदा : पाच वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झालेली पाटोदा पंचायत समितीची नवी इमारत अजूनही धुळखात पडून आहे. बीड जिल्ह्यातील बहुतेक पंचायत समित्या नव्या इमारतीत कार्यरत असताना, पाटोदा मात्र तांत्रिक कारणांची ढाल पुढे करत कोट्यवधी रुपयांची इमारत वापरात आणण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर सवाल निर्माण होत आहेत.या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटली, परंतु अद्याप अधिकृत उद्घाटन झालेले नाही. दरवर्षी नवीन तारखा देऊन ही बाब पुढे ढकलली जात आहे. आता जनतेच्या मनात प्रश्न आहे – "या येणाऱ्या १५ ऑगस्टला तरी या इमारतीचे उद्घाटन होणार का तालुक्यातील नागरीक, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी व स्थानिक नेते यांच्यातही या मुद्द्यावरून नाराजी वाढत आहे. पाटोदा तालुका विकासाच्या दृष्टीने मागे पडू नये यासाठी ही इमारत तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.एकीकडे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांच्या इमारतींचे लोकार्पण मोठ्या उत्साहात केले, तर दुसरीकडे पाटोद्याची इमारत मात्र पावसात ओलसर होत,गंजत व उन्हाळ्यात धूळ खात पडून आहे.या इमारतीच्या वापरा बाबत तांत्रिक अडचणी नेमक्या काय आहेत, त्यावर कोण उपाययोजना करणार, आणि येणाऱ्या १५ ऑगस्टला अखेर उद्घाटन होणार का – हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद