![]() |
डिजिटल मीडिया अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी बाबाजी वाघमारे तर पारनेर तालुका अध्यक्ष पदी राम तांबे यांची वर्णी |
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या डिजिटल मीडिया विभागातर्फे अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी बाबाजी सबाजी वाघमारे तर पारनेर तालुका अध्यक्षपदी राम रावसाहेब तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत त्यांना डिजिटल मीडिया अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री. विनोद गायकवाड यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक श्री. संजय भोकरे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष श्री. विनोद गायकवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
बाबाजी वाघमारे यांनी यापूर्वी पारनेर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, आता त्यांच्यावर जिल्हा सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राम तांबे यांनी पत्रकार संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून, यापूर्वी सचिवपदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
या निवडीबद्दल तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, शहराध्यक्ष भगवान गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय मोरे, निघोज शहराध्यक्ष आनंद भुकन, वृत्तवाहिनी प्रमुख सागर आतकर, सोशल मीडिया प्रमुख जय हरेल आदी पत्रकार उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद