प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन! वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती.
पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून प्रिया ही देशभरामध्ये हिंदी भाषिकांच्या घरोघरी ओळखीचा चेहरा झाली होती. अनेक मालिकांमध्ये प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या प्रियाचं एवढ्या लहान वयात निधन झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटे चार वाजता प्रियाचं मीरा रोड येथे निधन झालं. प्रियाच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद