सुनीलभाऊ साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ल्याचा पाटोद्यात सर्वपक्षीय निषेध

0

पाटोदा (प्रतिनिधी)

            अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ साळवे यांच्या कुटुंबावर नान्नज (ता. जामखेड) येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध पाटोदा येथे करण्यात आला. सोमवारी (दि. 15 सप्टेंबर 2025) सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विविध पक्षातील नेते, रिपब्लिकन पार्टीसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व शेकडो नागरिक सहभागी झाले. सर्वांनी एकमुखाने दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.आंदोलनादरम्यान हल्लेखोरांना शिक्षा करा!, साळवे कुटुंबाला न्याय द्या! न्याय मिळाला नाही तर तीव्र लढा उभारू! अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. वातावरण संतप्त व तणावपूर्ण बनले होते. निदर्शनावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणे करताना प्रशासनावर कठोर टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, हा हल्ला एका कुटुंबावर नसून संपूर्ण समाजावर आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा जिल्हाभर उग्र आंदोलन उभे राहील.” तसेच साळवे कुटुंबाला शासकीय पातळीवर तात्काळ सुरक्षा पुरवण्याची मागणीही करण्यात आली.निदर्शनानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात दोषींना अटक करून कठोर कारवाई करण्याचा ठाम इशारा देण्यात आला. या हल्ल्यामुळे समाजात भीती व संतापाचे वातावरण असून, दोषींना तात्काळ अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top