लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम असल्याने समाजाभिमुख कामांना चालना.- प्राचार्य अंकुश अवघडे

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी: सागर आतकर 

            पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी विद्या मंदिर येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुण त्यांना अभिवादन करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपप्राचार्य कैलास मोकळे, पर्यवेक्षक लक्ष्मण झंजाड, प्राध्यापक पाडळकर, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे, रामचंद्र महाराज सुपेकर, भास्कर कवाद, अनिल चौधरी, बाबाजी वाघमारे, सागर आतकर, संदीप गाडे, संपत वैरागर, जयसिंग हरेल, स्कूल कमीटीचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील, उपाध्यक्ष तथा पठारवाडी गावचे उपसरपंच दौलतराव सुपेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम असल्याने समाजाभिमुख कामांना चालना मिळाली असून पत्रकारीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुलिका देवी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश अवघडे यांनी व्यक्त केले आहे. 


ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र महाराज सुपेकर तसेच ज्येष्ठ शिक्षक मेहबूब इनामदार यांनी गेली दोनशे वर्षातील पत्रकारीतेचा इतिहास सांगताना इंग्रज सरकार ते आपले सरकार यातील फरक तसेच आजच्या पत्रकारीतेतील बदल याविषयी माहिती दिली.


यावेळी विद्यालयाचे शिक्षक महेबुब इनामदार, सबाजी बेलोटे, सुधीर धानापुणे, भास्कर काकडे, अरुण काळे, धनंजय खोसे, सुनील औटी, श्रीम.पुष्पा वराळ, श्रीम संगीता दिघे, श्रीम.अनिता काळे, श्रीम.ज्योती पोटे, श्रीम.प्रिया लहारे, श्रीम बालिका सोनवणे, अनिल हारदे, राहुल भालेकर, गणेश बारामते, दारकू खोडदे, अमोल खिलारी, शिवाजी गुंजाळ, श्रीम सुनताज इनामदार, बाबाजी शिंदे, दादासाहेब ठवाळ, सुधाकर शेळके, भाऊसाहेब लामखडे, श्रीम. पूनम शिंदे विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब इनामदार यांनी केले तर आभार काळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top