पारनेर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे न्यू.इंग्लिश स्कूल हंगे ता-पारनेर या विद्यालयात रयत मिनी गुरुकुल अतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक बी वाय पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज येथील ग्रामीण कवी संदीप राठोड यांचे प्रोत्साहनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मिनी-गुरुकुल प्रमुख रमेश दरेकर व बाह्यतज्ञ व्याख्यान प्रमुख राजेंद्र टापरे यांनी केले होते. यावेळी ग्रामीण कवी संदीप राठोड यांनी नारीशक्ती,बाप,मी पांगळा प्रवासी,सूर्याची किनार अशा अनेक कविता सादर करून विद्यार्थी व उपस्थीतांची मने जिंकली. त्याचबरोबर कविता कशी सुचते आणि कवी कसा घडत जातो तसेच कवीतेचा समाजावर आणि समाजाचा कवीमनावर काय परिणाम होतो याचाही उलगडा केला. राठोड यांनी विद्यालयातील खेळाडूंना खेळाचे महत्त्व सांगीतले व मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक संदीप शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम,विविध चिन्हांचे अर्थ व माहिती दिली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी वाय पांडूळे ,कवी संदीप राठोड,शिक्षक रमेश दरेकर,संदीप शिंदे, सुदर्शन धस,सागर अनंत,राजेंद्र टापरे, अनिल खांदवे,रोहिदास भालेराव शिक्षिका जयश्री क्षीरसागर,शोभा भालेराव,भारती म्हस्के,सुवर्णा भोर,राजश्री धात्रक,कल्पना चौधरी,जयश्री बांडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी जयसिंग खोडदे, अरुण लोंढे,पायमोडे मामा, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले.शेवटी रमेश दरेकर यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद