आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत टाकळी ढोकेश्वरचे सुपुत्र अनिकेत रंगनाथ थोपटे यांनी मिळवला प्रथम क्रमांक

0
पारनेर प्रतिनिधी             
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरचे सुपुत्र अनिकेत रंगनाथ थोपटे यांनी अंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांचा विजय मोहन राज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बंगलोर येथील नेचर इन फोकस ह्या आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि छायाचित्रण स्पर्धेत पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अनिकेत रंगनाथ थोपटे यांनी कलात्मक निसर्ग या विभागातील प्रथम पुरस्कार विजय मोहन राज (आयएफएस कर्नाटक) यांच्या हस्ते घेतला. रोख रक्कम ५०,००० रू, त्याचबरोबर नेचर वंडरर्स तर्फे भारतातील प्रसिद्ध अभयारण्यात अभ्यासात्मक शिष्यवृत्ती व लेसी या कंपनी तर्फे अनेक आकर्षक बक्षीसे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.आशिया खंडातील नामांकित ३००० हून जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. यंदा या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते National geographic व BBC earth यांसारख्या जगप्रसिध्द संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या काही प्रसिध्द छायाचित्रकारांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. वन्यजीवन आणि निसर्ग संवर्धन या साठी "नेचर इन फोकस" ही संस्था आशिया खंडात सर्वात मोठा सोहळा व स्पर्धेचे आयोजन करते. या ठिकाणी देशातील विविध शास्त्रज्ञ ,संवर्धक व इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने भेट देतात.



                      अनिकेत रंगनाथ थोपटे हे संगणक अभियांत्रिकीचे पदवीधर असून बालपणापासून त्यांना छायाचित्रणाची आवड होती अशा या ध्येयवेड्या छायाचित्रकाराने ज. जी कलामहाविद्यालयात शिक्षण घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कित्येक वेळा आपला ठसा उमटवला आहे ज्यात मुंबई प्रांतात भरवण्यात आलेल्या Exposure सारख्या स्पर्धांमध्ये सलग दोन वेळा वन्यजीवन या विभागात प्रथम पुरस्कार घेतला असून व्यक्तिचित्रणासाठी सुद्धा पुरस्कार घेतला आहे, या खेरीज गोल्डन टर्टल सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे . सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या ज. जी कलामहाविद्यालयामध्ये त्यांना अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते देखील छायाचित्रणासाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून आतापर्यंत त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक प्रदर्शनांत छायाचित्रे झळकली आहेत. यंदाच माथेरान नगरपालिका व वन्यजीव विभाग यांनी माथेरान मधील जैवविविधतेचा सखोल अभ्यास व छायाचित्रण प्रकल्पासाठी अनिकेत थोपटे यांची निवड केली आहे.
             ड्यामसेल फ्लाय जातीच्या कीटकाच्या स्केलेटन वर फिरणारा सूक्ष्म स्प्रिंगटेल जातीचा किटक अनिकेत यांनी टिपला. मैकरो छायाचित्रण प्रकारात हा दुर्मिळ क्षण त्यांना विजयाचा मानकरी करून गेला.

चौकट

अनिकेत थोपटे यांचे वडील रंगनाथ थोपटे हे गेली पंचवीस वर्षापासून मुंबई येथे स्थायिक असून मुंबई महानगरपालिकेत लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत तसेच अनिकेत यांची आई अश्विनी रंगनाथ थोपटे या गृहिणी म्हणून कार्यरत आहेत अनिकेत याच्या यशाचा आई वडीलांना आनंद झाला असून अनिकेत याचे हे छायाचित्रानाचे यश सर्व परिवाराला आप्तेष्टांना व मित्र परिवाराला सुखावणारे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी News महाराष्ट्र दर्शन शी बोलताना व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top